पुणे: पुणे शहर वाहतूक पोलीस दलाच्या क्षमतेत लक्षणीय वाढ घडवून आणण्यासाठी “पुणे वाहतूक पोलीस अॅकेडमी” ही संकल्पना यशस्वीरित्या प्रत्यक्षात आणण्यात आली आहे. मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांच्या कल्पनेतून आणि मा. अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग), पुणे शहर, श्री मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, दिनांक २३ फेब्रुवारी २०२५ ते १० मे २०२५ या कालावधीत तब्बल १८ प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करण्यात आले.
या विशेष प्रशिक्षण मोहिमेत पुणे शहर वाहतूक शाखेतील १००% अधिकारी व अंमलदार (एकूण ६३ पोलीस अधिकारी आणि १०४५ पोलीस अंमलदार) यांना सखोल प्रशिक्षण देण्यात आले. या उपक्रमात वाहन वाहतूक नियंत्रण, सॉफ्ट स्किल्स, मानसोपचार, नियमांचे पालन, ग्रीन कॉरिडोर, व्हिव्हीआयपी कॅन्व्हॉय व्यवस्थापन, सीपीआर, ई-चलान पद्धतीसह अत्याधुनिक आणि व्यावसायिक विषयांचा समावेश होता.
प्रशिक्षणात समाविष्ट महत्त्वाचे घटक:
-
सॉफ्ट स्किल्स आणि मानसशास्त्रीय दृष्टिकोन: नागरिकांशी संवाद, सहानुभूतीपूर्ण व्यवहार
-
वाहतूक कायद्याचे सखोल ज्ञान: मोटार वाहन कायदा, रस्ता वाहतूक नियम
-
अत्यावश्यक सेवा प्रक्रियेचे ज्ञान: ग्रीन कॉरिडोर, व्हीव्हीआयपी कॅनव्हॉय, फायर ब्रिगेड
-
प्राथमिक उपचार (CPR) व अपघात व्यवस्थापन
-
ई-चलान प्रात्यक्षिक प्रशिक्षण







