मुंबई / पुणे : अखेर प्रतीक्षेच्या क्षणांना आज विराम मिळणार आहे! महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेतलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल आज मंगळवार, १३ मे २०२५ रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी याबाबत माहिती दिली आहे.
नववी विभागीय मंडळांचा समावेश
या परीक्षेत पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांतून लाखो विद्यार्थी सहभागी झाले होते. निकालानंतर विद्यार्थ्यांना विषयनिहाय संपादित गुण पाहता येणार असून, त्याची प्रिंटआऊट प्रत देखील काढता येईल.
निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळे :
-
https://results.digilocker.gov.in
-
https://sscresult.mahahsscboard.in
-
http://sscresult.mkcl.org
-
https://results.targetpublications.org
-
https://results.navneet.com
-
https://www.tv9hindi.com/education/board-exams/maharashtra-board-exams
-
https://education.indianexpress.com/boards-exam/maharashtra-ssc-10-results
-
https://www.indiatoday.in/education-today/results
-
https://www.aajtak.in/education/board-exam-results
निकालानंतर पुढील काय?
✅ गुणपडताळणी व उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी अर्ज –
विद्यार्थ्यांना आपल्या अनिवार्य विषयांपैकी कोणत्याही विषयात गुणांची पडताळणी किंवा उत्तरपत्रिकेची छायाप्रती हवी असल्यास, मंडळाच्या संकेतस्थळावरून १४ मे ते २८ मे २०२५ दरम्यान अर्ज करता येईल.
✅ पुनर्मूल्यांकनासाठी आधी छायाप्रती आवश्यक –
पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करण्यासाठी आधी उत्तरपत्रिकेची छायाप्रती घेणे बंधनकारक आहे. ही छायाप्रती मिळाल्यानंतर ५ कार्यालयीन दिवसांत पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाइन अर्ज करता येईल.
✅ शुल्क भरण्याची ऑनलाईन सुविधा –
Debit Card, Credit Card, UPI, Net Banking यांद्वारे शुल्क भरता येणार आहे.
गुणसुधाराची सुवर्णसंधी :
फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये सर्व विषयांसह उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना श्रेणी / गुणसुधार (Class Improvement Scheme) अंतर्गत पुढील तीन संधी – जून-जुलै २०२५, फेब्रुवारी-मार्च २०२६ व जून-जुलै २०२६ मध्ये मिळणार आहेत.
पुरवणी परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू
ज्यांना काही विषयांमध्ये अपयश आले आहे, त्यांनी निराश होऊ नये. अशा विद्यार्थ्यांसाठी जून-जुलै २०२५ मध्ये आयोजित होणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी १५ मे २०२५ पासून ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. यासाठी स्वतंत्र परिपत्रक लवकरच जाहीर होणार आहे.
शाळांसाठी एकत्रित निकाल आणि सांख्यिकीय माहिती :
https://mahahsscboard.in (School Login) या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल व इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होणार आहे.
विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे :
-
निकाल जाहीर होताच संबंधित संकेतस्थळांवर त्वरित लॉगिन करून निकाल पाहा.
-
आपला हॉलतिकिट क्रमांक आणि आईचे नाव तयार ठेवा.
-
निकालाची प्रिंट काढून ठेवा.
-
अधिक माहितीसाठी आणि शंका निरसनासाठी आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकांशी किंवा विभागीय मंडळाशी संपर्क साधा.






