अग्निशमन विभागाच्या सूत्रांनुसार, लक्ष्मी चौकातील दुकाने एकाच पत्र्याच्या शेडखाली उभारली गेली होती. रविवारी सायंकाळी पाच वाजता एका दुकानाला आग लागली आणि ती तात्काळ आजुबाजूच्या दुकानांमध्ये पसरली. यामध्ये गादी कारखाना, पूजा भांडार, सायकल दुकान, काच दुकान, किराणा साहित्याचे दुकान, पेंट दुकान अशी विविध दुकाने समाविष्ट आहेत. या दुकांनातील माल जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे एका दुकानातील रोख रक्कम देखील जळाल्याने व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.