परभणी जिल्ह्यातील वरोडा नाका ते परभणी शहर असा ‘सद्भावना पदयात्रेचा’ पहिला टप्पा आज जनसामान्यांच्या प्रचंड सहभागाने आणि जोरदार घोषणांनी उत्साहात पार पडला. एकता, सामाजिक समता आणि संविधानाच्या मूल्यांच्या रक्षणासाठी काँग्रेसकडून काढण्यात आलेली ही पदयात्रा म्हणजे केवळ राजकीय उपक्रम नसून समाजातील असंतोष समजून घेण्याचा प्रयत्न असल्याचे नेतृत्वाने स्पष्ट केले.
आजच्या पदयात्रेत प्रमुख मान्यवरांचे नेतृत्व:
🔸 काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ 🔸 माजी मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, नितीन राऊत 🔸 अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव कुणाल चौधरी 🔸 खासदार डॉ. कल्याण काळे, रविंद्र चव्हाण 🔸 माजी मंत्री सुरेश वरपुडकर, आमदार प्रज्ञा सातव 🔸 सद्भावना यात्रेचे समन्वयक माजी आमदार मोहन जोशी 🔸 माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, राहुल बोंद्रे 🔸 शहराध्यक्ष नदिम ईनामदार, बयाजी शेळके, अँड. तोफिक मुल्लाणी, अक्षय शेळके, उमेश पाडळकर व इतर कार्यकर्ते
यात्रेचे वैशिष्ट्य:
▪️ शेकडो नागरिकांचे उत्स्फूर्त स्वागत – वाटेत फुलांची उधळण, ढोल-ताशा, जल्लोष आणि घोषणांनी वातावरण भारले गेले. ▪️ शेतकरी, युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचा विशेष सहभाग – या घटकांचे प्रश्न ऐकण्याचा प्रयत्न. ▪️ प्रत्येक गावात जनतेचा आत्मीय प्रतिसाद – पदयात्रेला मिळालेला प्रतिसाद हे काँग्रेसच्या जनाधाराचे द्योतक.
सामाजिक न्याय आणि लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्याचा निर्धार
सद्भावना यात्रेमुळे संविधानाचे संरक्षण, सामाजिक सलोखा, शिक्षणाचे हक्क, महिला आणि शेतकऱ्यांचे प्रश्न यासारख्या मुद्द्यांवर व्यापक जनजागृती केली जात आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले की, “ही यात्रा म्हणजे जनतेशी थेट संवाद साधण्याचे माध्यम आहे. समाजात निर्माण झालेला नैराश्य दूर करण्यासाठी काँग्रेस बांधिल आहे.”
पुढील टप्प्यांतूनही हाच जोश आणि जनतेच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न सुरु राहणार
पदयात्रेच्या पुढील टप्प्यांमध्ये इतर जिल्ह्यांमध्येही या उपक्रमाला अधिक मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे. काँग्रेसचा हा समाजाभिमुख चेहरा आता रस्त्यावर उतरला असून, देशातील विविध घटकांच्या आवाजाला मंच देण्याचा हा एक ठोस प्रयत्न ठरत आहे.