पुणे :- महाराष्ट्र शासनाच्या महसूल, वन विभाग आणि पोलीस खात्यात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून अनेक तरुणांना गंडा घालणाऱ्या भामट्याला पुणे गुन्हे शाखेच्या युनिट-२ ने अटक केली आहे. आरोपीने तब्बल २० ते ३० जणांकडून लाखो रुपये उकळल्याचे उघडकीस आले असून, यामध्ये आणखी काही सरकारी कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याची शक्यता आहे.
फसवणुकीचा गोरखधंदा – आरोपीचा गुन्हेगारी प्रवास!
🔹 आरोपी महादेव बाबूराव दराडे (वय ३२, रा. वाकड, पुणे) याने स्वतःला महसूल सचिव असल्याचे भासवून २०२२ ते २०२५ दरम्यान पुणे आणि इतर जिल्ह्यांमध्ये अनेक उमेदवारांची फसवणूक केली. 🔹 तो सरकारी कार्यालयांमध्ये सहज वावरत असल्याने लोकांचा विश्वास संपादन करायचा आणि महसूल, वन व पोलीस खात्यात वर्ग-१ व वर्ग-२ पदांवर नियुक्ती मिळवून देण्याचे आमिष दाखवून मोठ्या रकमा उकळायचा. 🔹 आरोपीच्या घरातून खोट्या नियुक्तीपत्रांसह शासकीय शिक्के, लेटरहेड्स, बनावट ओळखपत्रे, बँक चेकबुक्स व अन्य महत्त्वाचे दस्तऐवज जप्त करण्यात आले आहेत.
मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश – दुसरा आरोपी ताब्यात!
🔸 फसवणुकीच्या या प्रकरणात महसूल विभागातील सहायक क्लार्क रणजित लक्ष्मण चौरे (वय ३५, रा. धायरी, पुणे) याचा देखील सहभाग उघड झाला आहे. 🔸 चौरे हा बनावट नियुक्तीपत्रे तयार करून उमेदवारांना देत होता. त्यामुळे हा गुन्हा संघटित टोळीने रचलेला फसवणुकीचा कट असल्याचे स्पष्ट झाले आहे. 🔸 पोलिसांनी दोघांनाही अटक करून आणखी काही सरकारी अधिकाऱ्यांचा या प्रकरणाशी संबंध आहे का? याचा तपास सुरू केला आहे.
नागरिकांना मोठा धडा – बनावट नियुक्त्यांना बळी पडू नका!
पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, शासकीय नोकरीच्या आमिषाने कुणालाही पैसे देऊ नका. सर्व निवड प्रक्रिया अधिकृतपणे एमपीएससी किंवा इतर सरकारी चॅनेलमार्फत होते. अशी फसवणूक झाल्यास तात्काळ संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवा!
या प्रकरणात आणखी किती जणांना फसवले? पोलिसांचा सखोल तपास सुरू!
✅ महसूल, पोलीस आणि वन विभागातील २० ते ३० उमेदवारांना गंडा! ✅ १० लाखांपासून २० लाखांपर्यंत रक्कम लंपास! ✅ फसवणुकीसाठी शासकीय दस्तऐवज आणि बनावट नियुक्तीपत्रांचा वापर! ✅ अधिकारी, उमेदवार आणि दलालांच्या संधानावर पोलिसांची चौकशी सुरू!
महाराष्ट्रात अशा फसवणुकीस आळा घालण्यासाठी कठोर कारवाईची गरज!