Home Breaking News बालकाकडून ५.६० लाखांचे सोन्याचे दागिने हस्तगत – भारती विद्यापीठ पोलिसांची प्रभावी कारवाई!

बालकाकडून ५.६० लाखांचे सोन्याचे दागिने हस्तगत – भारती विद्यापीठ पोलिसांची प्रभावी कारवाई!

पुणे: भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एका धक्कादायक घटनेत एका विधीसंघर्षित बालकाने तब्बल ५,६०,०००/- रुपयांच्या किमतीचे ७३.५ ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी तातडीने तपास करून संशयित बालकाला ताब्यात घेतले असून, चोरी गेलेले सर्व दागिने हस्तगत करण्यात यश मिळवले आहे.

पोलिसांची तत्परता; जलद तपासातून आरोपी गजाआड!

भारती विद्यापीठ पोलिसांनी तातडीने गुन्ह्याचा तपास सुरू करताच, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सावळाराम साळगांवकर यांनी विशेष तपास पथक गठीत केले. पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तपासाची सूत्रे हालवली आणि काही तासांतच हा गुन्हा उघडकीस आणला.

तपासादरम्यान पोलीस अंमलदार मंगेश पवार, महेश बारवकर, अभिनय चौधरी यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे संशयिताचा शोध घेण्यात आला. अखेर विधीसंघर्षित बालकानेच हा गुन्हा केल्याचे स्पष्ट झाले. त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून चोरीला गेलेले सर्व सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले.

पोलिसांच्या धडाकेबाज कारवाईमुळे मोठा गुन्हा उघड

या गुन्ह्याची नोंद भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा रजि क्रमांक १७९/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०५ (अ) अंतर्गत करण्यात आली आहे. पोलिसांच्या त्वरित कारवाईमुळे चोरीला गेलेले मौल्यवान दागिने मिळाल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन आणि कौतुक

ही उल्लेखनीय कारवाई पुणे शहर पोलीस आयुक्त मा. अमितेश कुमार, सह आयुक्त श्री. रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) श्री. प्रविणकुमार पाटील, पोलीस उप आयुक्त (परिमंडळ २) श्रीमती स्मार्तना पाटील आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (स्वारगेट विभाग) श्री. राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

विशेष तपास पथकात समाविष्ट असलेल्या पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. राहुलकुमार खिलारे, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार महेश बारवकर, मंगेश पवार, सचिन सरपाले, सचिन गाडे, निलेश खैरमोडे, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे आणि तुकाराम सुतार यांच्या अथक प्रयत्नांमुळे हा गुन्हा उघडकीस आला.

गुन्हेगारीवर पोलिसांचा वचक – नागरिकांना दिलासा!

पोलिसांच्या या जलद आणि प्रभावी तपासामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीवर वचक बसला आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी पुणे पोलिस अहोरात्र कार्यरत असून, यापुढेही अशा प्रकारच्या घटनांवर कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.