पुणे : पुण्यातील कळेपडळ पोलिस ठाण्याने चपळ कारवाई करत अल्पवयीन चोरट्याला अटक केली असून त्याच्याकडून तब्बल ₹1.92 लाख किमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या मालामध्ये चार दुचाकी वाहने आणि ₹9,000 रोख रक्कम यांचा समावेश आहे.
प्रकरणाचा तपशील:
दि. 15 मार्च 2025 रोजी प्रवीण कुमार अग्रवाल (रा. हांडेवाडी रोड, हडपसर, पुणे) यांनी कळेपडळ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्यांनी आपली होंडा पॅशन प्रो ही मोटारसायकल कोंढवा-उंद्री परिसरात पार्क केली होती. ही गाडी चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले.
त्याच रात्री पोलीस हवालदार लक्ष्मण काळे आणि विशाल ठोंबरे हे गस्त घालत असताना उंद्री परिसरात एका व्यक्तीला दुचाकी ढकलत जाताना पाहिले. संशय आल्याने त्यांनी त्याला थांबवून विचारपूस केली असता तो पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले आणि पोलीस ठाण्यात आणले.
चोरट्याची ओळख:
अटक करण्यात आलेल्या संशयिताने आपले नाव नितीन कालूराम पाटोळे (वय 16, रा. डांडेकर पूल, पुणे) असे सांगितले. चौकशीदरम्यान त्याने अनेक वाहनचोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली. त्याने चोरी केलेल्या वाहनांमध्ये खालील दुचाकींचा समावेश आहे:
-
Honda Passion Pro (कोंढवा)
-
Honda CB Shine (हडपसर)
-
KTM 200 Duke (वानवडी)
-
Honda Activa 110 (कोंढवा)





