Home Breaking News मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले जगद्गुरु दत्त चिले महाराजांचे दर्शन; कोल्हापूरमध्ये भव्य...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले जगद्गुरु दत्त चिले महाराजांचे दर्शन; कोल्हापूरमध्ये भव्य स्वागत-सत्कार!

170
0

कोल्हापूर :- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पैजारवाडी, कोल्हापूर येथील जगद्गुरु दत्त चिले महाराज मंदिरात भक्तिभावाने दर्शन घेतले व आशीर्वाद प्राप्त केले. या पवित्र दर्शनानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोल्हापूरमधील विविध कार्यक्रर्यांमध्ये सहभाग घेतला.

आज संध्याकाळी ७.३५ वाजता कोल्हापूर दौऱ्यावर असताना त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक कार्यालयास भेट दिली. या वेळी त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यांच्या आगमनानंतर भाजपा महिला कार्यकर्त्यांनी औक्षण करून सन्मान केला. तसेच स्थानिक कार्यकर्त्यांनी त्यांना महाराष्ट्राच्या परंपरेचे प्रतीक असलेले वाघनखे, कट्यार आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजमुद्रेची प्रतिकृती भेट म्हणून दिली.

मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करत आपल्या भावना व्यक्त केल्या. “महाराष्ट्राच्या मातीशी जडलेली संस्कृती, परंपरा आणि येथील लोकांची निष्ठा यामुळेच आपले राज्य सर्वांगीण प्रगतीच्या मार्गावर आहे,” असे ते म्हणाले. तसेच त्यांनी कार्यकर्त्यांच्या प्रेम आणि स्वागताबद्दल मनःपूर्वक आभार मानले.

कोल्हापूर दौऱ्यादरम्यान त्यांनी शहरातील महत्त्वाच्या विकासकामांचा आढावा घेतला तसेच भविष्यातील योजनांबद्दल चर्चा केली. त्यांच्या या भेटीमुळे स्थानिक नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.