Home Breaking News पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल!

पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल!

82
0

पुणे शहरात १९ फेब्रुवारी २०२५ रोजी श्री. छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी होणार आहे. यानिमित्ताने “जय शिवाजी जय भारत” पदयात्रेचे आयोजन करण्यात आले असून, मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि नागरिक सहभागी होणार आहेत. यामुळे शहरातील मध्यवर्ती भागात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.

“जय शिवाजी जय भारत” पदयात्रेचा मार्ग

🛑 इंजिनिअरिंग कॉलेज ग्राऊंड → स. गो. बर्वे चौक → एसएसपीएमएस कॉलेज → छत्रपती शिवाजी महाराज पुतळा → स. गो. बर्वे चौक → मॉर्डन चौक → झाशी राणी चौक (होल्ट) → खंडोजी बाबा चौक → गुडलक चौक → फर्ग्युसन कॉलेज ग्राऊंड सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत वाहतूक बदल लागू

वाहतूक बदल – मार्ग बंद

🔴 जंगली महाराज रोड – संचेती हॉस्पिटल चौक ते खंडोजी बाबा चौक
🔴 फर्ग्युसन कॉलेज रोड – खंडोजी बाबा चौक ते फर्ग्युसन कॉलेज गेट
🔴 टिळक रोड – खंडोजी बाबा चौकाकडे जाणारी वाहतूक
🔴 केळकर रोड – झेड ब्रिजमार्गे डेक्कनकडे जाणारी वाहतूक
🔴 मिडे पूल – डेक्कनकडे जाणारी वाहतूक

पर्यायी मार्ग

✔ बाणेर, पाषाण, कोथरूड, कर्वेरोडकडे जाणारी वाहने – सेनापती बापट रोडने जाऊ शकतात.
✔ एस.एन.डी.टी. कॉर्नरमार्गे लॉ कॉलेज रोड, एस.बी. रोड वापरावा.
✔ अलका टॉकीज चौकातून सेनादत्त चौक, बालशिवाजी नळस्टॉप मार्गे प्रवास करावा.
✔ गरुड गणपती चौक, टिळक चौक, शास्त्री रोड मार्गे जावे.
✔ पुरम चौकातून टिळक रोडने एफ.सी. रोड मार्गे पुढे जाता येईल.

वाहन पार्किंग व्यवस्था

इंजिनिअरिंग कॉलेज चौकाजवळ विद्यार्थी उतरून संगमवाडी पार्किंगमध्ये वाहनं लावावी.
कर्वे रोड व कोथरूड कडून येणाऱ्या वाहनांसाठी नदीपात्रातील पार्किंग व्यवस्था.
स्वारगेट, हडपसर, दांडेकर पूल मार्गे येणारी वाहनं नदीपात्रात पार्क करावी.
पुणे विद्यापीठ, बाणेर, पाषाणहून येणारी वाहनं अॅग्री कॉलेज ग्राऊंडमध्ये पार्क करावी.

शिवजयंती मुख्य मिरवणूक मार्गावरील वाहतूक बदल

सकाळी ६ पासून गर्दी संपेपर्यंत लक्ष्मी रोड, शिवाजी रोड, बाजीराव रोडवरील वाहतूक पूर्णपणे बंद.
पर्यायी मार्ग:
जिजामाता चौक → खंडोजी बाबा चौक → टिळक चौक → एफ.सी. रोड मार्गे पुढील प्रवास.
स. गो. बर्वे चौक → झाशी राणी चौक → पुणे मनपा भवनकडे जाण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध.
कुंभार वेस → राष्ट्रवादी कार्यालय → सावरकर चौक मार्गे प्रवास.
मिरवणूक लक्ष्मी रोडवर असताना वाहतूक संतकबीर चौक समर्थ विभाग हद्दीत वळविली जाईल.

पुणेकरांनी या बदलांची नोंद घेऊन आपल्या प्रवासाची पूर्वयोजना करावी.

 पुणे वाहतूक पोलिसांकडून नागरिकांना सहकार्याची विनंती!