मॅरेथॉन दिनांक : १६ फेब्रुवारी २०२५ | वेळ : पहाटे ०४:०० ते सकाळी १०:०० 📍 ठिकाण : बाणेर आणि चतुःश्रृंगी परिसर, पुणे
पुणे शहरात येत्या १६ फेब्रुवारी रोजी लोकमत वृत्तपत्राच्या वतीने महामॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे पुणेकरांचा उत्साह वाढणार असला तरी वाहतुकीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. नागरिकांनी गैरसोयी टाळण्यासाठी यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
🏃 महामॅरेथॉन मार्ग आणि वाहतूक बदल 🚦
महामॅरेथॉनसाठी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकूल, म्हाळुंगे येथून प्रारंभ होईल आणि खालील प्रमुख चौकांमधून जाईल – ✅ राधा चौक → बालेवाडी हायस्ट्रिट → ममता चौक → लक्ष्मी माता मंदिर चौक → गणेश दत्त मंदिर चौक → ज्युपिटर हॉस्पिटल चौक → अॅलोमा काऊंटी रोड → बाणेर लिंक रोड → नागरस रोड → भाले चौक → वेस्टएन्ड मॉल रोड → परिहार चौक → ब्रेमेन चौक → राजभवन → परत छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकूल
🚧 महत्त्वाचे वाहतूक बदल :
🔹 राधा चौक ते सायकर चौक वाहतूक सकाळी ०४:०० ते ०९:०० बंद राहणार 🔹 सायकर चौक ते ममता चौक जाणारी वाहतूक बंद 🔹 सायकर चौक ते लक्ष्मी माता मंदिर आणि गणेश मंदिर चौक दुतर्फा वाहतूक सुरू राहील 🔹 राजभवन ते ऋषी मल्होत्रा चौक वाहतूक पूर्णपणे बंद राहील 🔹 मॅरेथॉन मार्गावरील सर्व रस्त्यांवर ‘नो पार्किंग – नो हॉल्टिंग’ नियम लागू
🚨 नागरिकांसाठी पोलिसांचे आवाहन
✅ पर्यायी मार्गाचा वापर करावा ✅ वाहतूक पोलीस आणि स्वयंसेवकांना सहकार्य करावे ✅ मॅरेथॉन मार्गावरील गाड्या अन्यत्र पार्क कराव्यात ✅ सकाळच्या वेळेत महत्त्वाच्या प्रवासाचे नियोजन आधीच करावे
🗣 पोलिस उपआयुक्त वाहतूक पुणे, अमोल झेंडे यांनी नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. 📞 अधिक माहितीसाठी वाहतूक नियंत्रण कक्ष – ०२०-२६६८५००० वर संपर्क साधावा.
🔴 पुण्यातील क्रीडाप्रेमींसाठी मोठी संधी असली तरी, वाहनधारकांनीही काळजी घेण्याची गरज आहे. सुरक्षित आणि सुरळीत वाहतुकीसाठी नागरिकांनी सहकार्य करावे.