🔹 पुण्यातील आंतरराष्ट्रीय दर्जाची शरीरसौष्ठव स्पर्धा
🔹 शरीरसौष्ठव प्रेमींसाठी सुवर्णसंधी – विजेत्यांना पाच लाखांचे बक्षीस!
पुणे शहराच्या क्रीडा परंपरेला सन्मान मिळवून देणारी ‘पुणे श्री २०२५’ शरीरसौष्ठव स्पर्धा येत्या १६ फेब्रुवारी रोजी नवी पेठेतील लोकमान्य नगर जॉगिंग पार्क येथे भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आली आहे. द हिंदू फाउंडेशन यांच्या वतीने आणि पुणे जिल्हा हौशी शरीरसौष्ठव संघटना व फेडरेशन ऑफ बॉडी बिल्डिंग अँड फिजिक स्पोर्ट्स यांच्या सहकार्याने ही स्पर्धा रंगणार आहे.
राज्यातील नामांकित बॉडीबिल्डर्स एकाच व्यासपीठावर!
या स्पर्धेत महाराष्ट्रभरातील नामांकित शरीरसौष्ठवपटू सहभागी होणार असून, जिल्हास्तरीय पातळीवर अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाणारी ही स्पर्धा आहे. शरीरसौष्ठव क्षेत्रातील उदयोन्मुख खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्याच्या दृष्टीने ‘पुणे श्री’ स्पर्धा महत्त्वाची ठरते.
स्पर्धेतील गट आणि आकर्षक बक्षिसे!
🔹 वजनी गट: ५५, ६०, ६५, ७०, ७५, ८० आणि ८० किलोवरील अशा सात गटांमध्ये विजेते ठरवले जाणार आहेत.
🔹 विजेत्यांचे सन्मान: प्रत्येक वजनी गटातून १ ते १० क्रमांकांपर्यंतचे विजेते घोषित केले जातील.
🔹 मेन्स फिजिक श्री २०२५:
-
१६५ सेंटीमीटरपर्यंत आणि १६५ सेंटीमीटरवरील अशा दोन गटांमध्ये स्पर्धा होणार आहे.
-
या दोन्ही गटांमध्येही १ ते १० विजेते घोषित करण्यात येतील.
🔹 एकूण रोख बक्षीस: स्पर्धकांसाठी ५ लाख रुपयांची रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत.





