0
0
0
0
0

नागपूर

Home नागपूर
नागपुर मधील बातम्या

राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये लवकरच पदभरती; मनुष्यबळाची कमतरता दूर होणार – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

नागपूर : राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये दीर्घकाळापासून जाणवत असलेली मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यासाठी आकृतीबंधानुसार पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानपरिषदेत केली. वित्त विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करून ही भरती प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विधानपरिषद सदस्य सतीश चव्हाण यांनी कृषी विद्यापीठांतील मनुष्यबळाबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. या सूचनेला उत्तर देताना...

पुणे रिंग रोड प्रकल्प, रस्त्याची कामे व मेट्रो कॅरिडोरची कामे प्रगतीपथावर – मंत्री दादाजी भुसे

नागपूर : पुणे शहर व परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी रिंग रोड सह विविध रस्ते व मेट्रो प्रकल्पाची कामे सुरु आहेत. रिंगरोडच्या पूर्व भागाचे काम मे 2028 पर्यंत आणि पश्चिमेकडील भागाचे काम मे 2026 पर्यंत पूर्ण होईल. तसेच हडपसर-लोणी काळभोर मेट्रो कॅरिडॉरच्या कामाची तांत्रिक व्यवहार्यता तपासून कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती मंत्री दादाजी भुसे यांनी दिली. सदस्य राहुल कुल यांनी पुणे रिंग रोड व इतर प्रकल्पासंदर्भात...

जाणीव, प्रशिक्षण आणि संशोधन – समृद्ध लोकशाहीचे त्रिसूत्र : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

नागपूर : लोकशाही अधिक बळकट आणि समृद्ध करण्यासाठी जाणीव, प्रशिक्षण आणि संशोधन या तीन घटकांचा समन्वय आवश्यक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशनच्या माध्यमातून राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांना विधिमंडळातील प्रशिक्षण मिळते, त्यामुळे कायदे कसे बनतात, संसदीय प्रक्रिया कशा प्रकारे चालतात याचे सखोल ज्ञान विद्यार्थ्यांना प्राप्त होते. अशा उपक्रमांमुळे लोकशाही अधिक समृद्ध...

नागपूरमधील लीज प्रॉपर्टीज फ्री-होल्ड करण्याबाबत विचार करणार – मंत्री शंभूराज देसाई

नागपूर, दि. 15 :  नागपूर महानगरपालिका व सुधार प्राधिकरणाच्या भाडेपट्ट्याने दिलेल्या मालमत्तांबाबतचे करार संबंधित अटी-शर्तींनुसार सुरू आहेत. मात्र या मालमत्ता फ्री-होल्ड करून भूखंडधारक किंवा मालमत्ताधारकांना देण्याबाबतचा प्रस्ताव नुकताच  प्राप्त झाला असल्याने तो तातडीने तपासण्यात येईल, अशी माहिती  मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. नागपूर महानगरपालिका आणि नागपूर सुधार प्राधिकरणामार्फत भाडेपट्ट्याने दिलेल्या भूखंड व मालमत्तांबाबत विधानसभा सदस्य प्रवीण दटके यांनी लक्षवेधी सुचनेद्वारे मुद्दा उपस्थित...

पुणे महापालिकेत लोहगावासह ११ नवीन गावांचा विकास आराखडा अंतिम टप्प्यात; हरकती व सूचनांचा विचार करूनच डीपी जाहीर होणार – मंत्री उदय सामंत

नागपूर – पुणे महापालिकेत लोहगावासह ११ नवीन गावांचा समावेश प्रस्तावित विकास आराखड्याची (डीव्हीपी) अंतिम प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात आहे. नगरविकास मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत दिलेल्या माहितीनुसार, डीपी जाहीर करण्यापूर्वी कायद्यानुसार सर्व टप्पे पूर्ण करणे अनिवार्य आहे. सदस्य बापूसाहेब पठारे यांनी विधानसभा मध्ये लक्षवेधी सूचना उपस्थित केल्यानंतर मंत्री सामंत यांनी स्पष्ट केले की, संबंधित डीपीचा मसुदा १६ ऑक्टोबर २०२५ रोजी...

सशस्त्र सेना ध्वजदिन निधीचा सैनिकांच्या कुटुंबांना मोठा आधार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. 10 : सैनिकांनी देशासाठी केलेले समर्पण कुठल्याही मूल्यांमध्ये मोजता येत नाही. सैन्यातील खडतर जीवन जगून देशासाठी त्याग करणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबांना मदत करण्यासाठी शासनाकडून विविध उपक्रम राबविण्यात येतात. सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनातूनही सैनिकांच्या कुटुंबियांना मदत देण्यात येते. हा निधी सैनिकांच्या कुटुंबांना मोठा आधार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. रामगिरी शासकीय निवासस्थानी सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ कार्यक्रम...

Copyright ©