0
0
0
0
0

पुणे

Home पुणे Page 132

पुणे: रांजणगाव MIDC परिसरातून २१ बांगलादेशी नागरिक ताब्यात; पुणे ग्रामीण पोलीसांच्या दहशतवाद विरोधी पथकाची मोठी कारवाई.

पुणे ग्रामीण पोलीसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने, रांजणगाव पोलिसांच्या सहकार्याने, रांजणगाव औद्योगिक वसाहतीत अवैधरित्या राहत असलेल्या २१ बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या नागरिकांमध्ये १५ पुरुष आणि ४ महिलांचा समावेश आहे, तसेच त्यांच्यासाठी मदत करणाऱ्या दोन व्यक्तींनाही ताब्यात घेण्यात आले आहे. हे सर्वजण कर्‍हाडगावातील भाड्याच्या घरात राहत असल्याचे समोर आले आहे. पोलीस तपासादरम्यान या लोकांकडून बनावट ओळखपत्रे, निवडणूक कार्डांसह...

पिंपरी विधानसभा मतदारसंघ: विरोध असूनही अजित पवारांनी अण्णा बनसोडे यांना पुन्हा उमेदवारी; कार्यशैलीवर नाराज पक्षनेते नाराज.

अजित पवार यांच्या जवळचे असलेले अण्णा बनसोडे यांना पुन्हा उमेदवारी; पिंपरी-चिंचवड नॅशनलिस्ट काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद पिंपरी : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीने (NCP) पिंपरी विधानसभा मतदारसंघातून अण्णा बनसोडे यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. पक्षातील काही नेत्यांच्या विरोध असूनही बन्सोडे यांचे नाव निश्चित करण्यात आले. २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी हा निर्णय घेतला गेला आहे. मागील काही...

मतदारांना मताधिकार बजावण्यासाठी प्रोत्साहित करा; चिंचवड विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांचे नागरिकांना आवाहन

चिंचवड: आगामी चिंचवड विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी मतदारांना त्यांच्या लोकशाही हक्कांचा योग्य प्रकारे वापर करण्याचे आवाहन केले आहे. निवडणूक हा लोकशाही प्रक्रियेचा महत्त्वाचा भाग असून, नागरिकांनी आपल्या मताधिकाराचा वापर करणे गरजेचे असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले आहे. मतदानासाठी जनजागृती मोहीम: मतदारांना मतदान प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने प्रशासनाने विविध जनजागृती मोहिमा राबविण्याचा निर्णय घेतला आहे....

मद्यधुंद पर्यटकांनी केली होमस्टे मालकाच्या बहिणीची निर्घृण हत्या; चार जणांपैकी तीन अटकेत, मुख्य आरोपी फरार.

रायगड, हरिहरेश्वर : मद्यधुंद अवस्थेत आलेल्या पुण्यातील चार पर्यटकांनी होमस्टे मालकाला खोली न दिल्याच्या कारणावरून त्याच्यावर हल्ला केला आणि त्याच्या बहिणीला चारचाकी वाहनाने चिरडून ठार मारले. या धक्कादायक घटनेनंतर, पोलिसांनी त्वरित कारवाई करत तीन आरोपींना अटक केली आहे, तर मुख्य आरोपी अद्याप फरार आहे. रविवारच्या मध्यरात्री, हरिहरेश्वर येथील अभिजीत धामणास्कर यांच्या होमस्टे सेवा देणाऱ्या ठिकाणी सुमारे १२:३० वाजता चार पर्यटक...

पुणे मेट्रो मंडई स्टेशनच्या ग्राउंड फ्लोअरवर वेल्डिंगदरम्यान लागलेल्या आगीनं धुराचे लोट; पाच अग्निशमन गाड्यांच्या मदतीने पाच मिनिटांत आग आटोक्यात.

0

पुणे: मध्यरात्री सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास पुणे मेट्रोच्या मंडई स्टेशनच्या ग्राउंड फ्लोअरवर ठेवलेल्या फोम मटेरियलला अचानक आग लागली. आगीमुळे संपूर्ण स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणावर धुराचे लोट पसरले. पुणे अग्निशमन विभागाने तत्काळ पाच अग्निशमन बंब घटनास्थळी पाठवले आणि अवघ्या पाच मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने, या आगीत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही. वेल्डिंगदरम्यान लागली आग प्राथमिक माहितीनुसार, स्टेशनच्या कामादरम्यान वेल्डिंगचे काम...

वाघेश्वर महाराजांच्या कृपेने महेश लांडगे यांचा प्रचार जोशात सुरू, ‘भोसरी माझी आई, चारहोळी मावशी’ म्हणत विजयाची नांदी

महेश लांडगे यांनी वाघेश्वर महाराजांच्या आशीर्वादाने त्यांच्या राजकीय प्रचार मोहिमेला जोरदार सुरुवात केली आहे. त्यांनी आपल्या भाषणात अत्यंत भावनिक शब्दांत "भोसरी माझी आई आणि चारहोळी माझी मावशी" असे उद्गार काढले, ज्यातून त्यांचा या दोन गावांबद्दलचा सखोल स्नेह आणि आदर दिसून आला. भोसरीने त्यांना नेहमीच मायेची आणि प्रेमाची ऊब दिली, तर चारहोळीने त्यांच्या राजकीय आयुष्यात महत्त्वाचा आधार दिला आहे. लांडगे...

भाजपने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली

0

भारतीय जनता पक्षाने (भाजप) महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीतून प्रमुख उमेदवारांची निवडक नावे समोर आली आहेत, ज्यात नागपूर दक्षिण-पश्चिममधून देवेंद्र फडणवीस आणि कामठीमधून चंद्रशेखर बावनकुळे यांचा समावेश आहे. याशिवाय, 13 महिला उमेदवारांच्या नावांचीही यादी जाहीर करण्यात आली असून, यात मुंबईतील गोरेगावमधून माजी मंत्री विद्या ठाकूर यांचे नाव सामील आहे. यावेळी दिलेल्या यादीत मुंबईच्या...

पुण्यात सौन्य दलासाठी दारू गोळा बनविणाऱ्या खडकी ॲम्युनेशन फॅक्टरीतील कामगाराकडे आढळली जिवंत काडतुसे

सौन्य दलासाठी दारू गोळा बनविणाऱ्या खडकी ॲम्युनेशन फॅक्टरीतील कामगाराकडे ३१ जिवंत काडतुसे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. दोन महिने बेपत्ता असणाऱ्या कामगाराच्या दुचाकीच्या डिकीत ही काडतुसे आढळून आल्याने पोलिसांनी त्याला अटक केली आहे.भगवान दत्तात्रय सस्ते (वय ५३, रा. दिघी) असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या कामगाराचे नाव आहे. तर त्याचा साथीदार कामगार नितीन किसन माने याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला...

‘‘नराधमाला आमच्या ताब्यात द्या’’; आमदार महेश लांडगेंची थेट पोलीस ठाण्यात धडक!

0

पिंपरी-चिंचवडमध्ये एका धक्कादायक घटनेनंतर, आमदार महेश लांडगे यांनी थेट पोलीस ठाण्यात धडक मारत आरोपीला त्यांच्या ताब्यात देण्याची मागणी केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. लांडगे यांनी या प्रकरणात पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित करत, आरोपींवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आमदार लांडगे यांनी स्पष्ट केले की, अशा नराधमांनी समाजात वावरायला नको, त्यांना...

पिंपरी चिंचवड महापालिकेत महर्षी वाल्मिकी जयंती उत्साहात साजरी; विचार प्रबोधन पर्वासह विविध उपक्रमांचे आयोजन

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महर्षी वाल्मिकी यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील तसेच यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील महर्षि वाल्मिकी यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय कार्यालयात अभिवादन प्रसंगी उप आयुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी मनोज माछरे,अनिल लखन उपस्थित होते. तर यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय,संत तुकारामनगर येथील कार्यक्रमास अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे,अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डाॅ.अभयचंद्र दादेवार, तसेच डाॅ. मनिषा सुर्यवंशी,आरोग्य निरीक्षक राजकुमार वाघमारे, सिस्टर इनचार्ज सविता निगडे आदी उपस्थित होते. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने महर्षि वाल्मिकी विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन पिंपरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या शेजारी मोकळ्या मैदानात करण्यात आले होते. या प्रबोधन पर्वास उप आयुक्त अण्णा बोदडे,मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे,विधीतज्ञ अँड.सागर चरण, विशेष अधिकारी किरण गायकवाड, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल,कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष शशिकांत उर्फ बबन झिंजुर्डे,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, तसेच सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रबोधन पर्वाच्या प्रारंभी महापालिकेच्या आरोग्य आणि वैद्यकीय विभागातील उत्कृष्ट कामकाज करणा-या सफाई कामगार, वॉर्डबॉय, आया,आरोग्य निरीक्षक यांना प्रशस्तीपत्रक, शाल देऊन गौरविण्यात आले. सफाई कर्मचारी यांचेकरीता बहारदार हिंदी, मराठी गीतांसह महिला सफाई कर्मचाऱ्यांसाठी विशेष होम मिनिस्टर- खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये महिला सफाई कर्मचाऱ्यांनी सहभाग घेऊन उस्फुर्त प्रतिसाद दर्शवला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले तर उपस्थितांचे आभार किरण गायकवाड यांनी मानले.

Copyright ©