पुणे

Home पुणे Page 104

पिंपळे सौदागर येथे भीषण आग; कोट्यवधी रुपयांचे नुकसान

0

पिंपळे सौदागर येथे मध्यरात्री घडलेल्या भयंकर घटनेने सर्वत्र खळबळ माजवली आहे. कपड्याच्या दुकान आणि डेंटल क्लिनिकला लागलेल्या भीषण आगीत सुमारे एक कोटी १५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास या दोन व्यावसायिक ठिकाणी अचानक आग लागल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तत्काळ घटनास्थळी पोहोचल्या. १२ टँकरच्या साहाय्याने आग आटोक्यात आणण्यात यश...

विचारमंथनातून सकारात्मक ऊर्जेचा संचार – संवाद आणि सुसंवाद वाढवण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या ‘ऐश्वर्य कट्टा’ उपक्रमात आज वैचारिक चर्चा

0

पिंपरी, दि. १२ मार्च २०२५ : समाजात संवाद आणि सुसंवाद वाढवण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या ‘ऐश्वर्य कट्टा’ उपक्रमात आज वैचारिक चर्चा रंगली. या चर्चेत विविध सामाजिक विषयांवर विचारमंथन होऊन सकारात्मक ऊर्जेचा संचार झाला. 🔹 मान्यवर उपस्थितीया विशेष कट्ट्याचे मानकरी होते ABP माझाचे पश्चिम महाराष्ट्र ब्युरो चीफ मंदार गोंजारी आणि रेंज फॉरेस्ट ऑफिसर मनोज बारबोले पाटील. त्यांनी आपल्या अनुभवांमधून सामाजिक समस्या...

काळेपडळ पोलीस व अन्न व औषध प्रशासन विभागाची मोठी कारवाई – ७६ लाखांहून अधिक किमतीचा गुटखा जप्त!

0

पुणे: पुणे शहरातील काळेपडळ पोलीस ठाणे व अन्न व औषध प्रशासन विभागाने (FDA) संयुक्तरित्या मोठी कारवाई करत तब्बल ७६,४४,६५०/- रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि वाहतूक साधने जप्त केली आहेत. या कारवाईमुळे अवैध गुटखा विक्रीचा मोठा कट समोर आला आहे. गुप्त माहितीवरून पोलिसांची तत्काळ कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाच्या गुप्त वार्ता विभागाने मिळवलेल्या माहितीच्या आधारे काळेपडळ पोलिसांनी तातडीने पथक स्थापन केले. पुण्यातील...

पुण्यातील रस्त्यावर जीव धोक्यात घालून अश्लील चाळे; सार्वजनिक शिस्तीला सुरूंग!

0

पुणे – महाराष्ट्राची शैक्षणिक आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरातून एक अतिशय धक्कादायक आणि निषेधार्ह घटना समोर आली आहे. शिंदेवाडी – खेड-शिवापूर मार्गावर एका धावत्या दुचाकीवर एका जोडप्याने अश्लील चाळ्यांचे प्रदर्शन करत संपूर्ण शहराची अब्रू झाकली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. काय आहे नेमकी घटना? ▪️ व्हायरल व्हिडिओमध्ये...

हडपसरमध्ये चारचाकी चोरी प्रकरणाचा छडा – पुणे पोलिसांची चमकदार कारवाई, गुन्हेगार जेरबंद!

0

पुणे शहरात दिवसेंदिवस वाहनचोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. परंतु, पुणे पोलिसांनी आपल्या सतर्कतेने आणखी एक महत्त्वाची केस उघडकीस आणत चोरट्याला जेरबंद केले आहे. हडपसर पोलीस ठाण्याच्या दक्ष पथकाने चारचाकी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक करून, चोरलेली चारचाकी कार हस्तगत केली आहे. चारचाकी चोरीची घटना कशी उघडकीस आली? दिनांक २१ फेब्रुवारी २०२५ रोजी फिर्यादी यांनी कॅनालजवळ, पवार कॉलनी शेजारी, लेन नंबर ६ येथे...

हडपसरमध्ये नशेच्या इंजेक्शनची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या दोघांना अटक!

0

पुणे शहरातील हडपसर परिसरात नशा करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मॅफेनटरमाइन सल्फेट (टर्मीन) या घातक इंजेक्शनची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या दोन जणांना हडपसर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी सुमारे १९० इंजेक्शनच्या बाटल्या जप्त केल्या असून त्यांची एकूण बाजारभावानुसार किंमत सुमारे १ लाख रुपये आहे. दिनांक ९ मार्च २०२५ रोजी हडपसर पोलिसांच्या तपास पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे छापा टाकून ही कारवाई केली. तपास पथक...

पुण्यात भीषण दुर्घटना! कॅम्प परिसरात स्लॅब कोसळला; तरुण मजुराचा मृत्यू, चौघेजण गंभीर जखमी – बिल्डर व अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

0

पुणे : पुण्यातील कॅम्प परिसरात मंगळवारी सकाळी एक भीषण दुर्घटना घडली आहे. साचापीर स्ट्रीटवरील ओयसिस हॉटेल शेजारी सुरू असलेल्या इमारतीच्या बांधकामात स्लॅबचा भाग कोसळून एक तरुण मजूर ठार झाला असून, चार कामगार गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेने पुणेकरांमध्ये संतापाची लाट उसळली असून, बिल्डर व संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची जोरदार मागणी होत आहे.  स्लॅब कोसळताना सुरक्षा नियमांकडे...

अमरावतीत धक्कादायक घटना! महिला पोलिसाची सुपारी देऊन हत्या; पतीच निघाला खुनी

0

अमरावती शहरात तीन दिवसांपूर्वी घडलेल्या महिला पोलीस अंमलदार आशा धुळे-तायडे यांच्या गळा दाबून झालेल्या हत्येचे गूढ अखेर उकलले आहे. या खळबळजनक प्रकरणात त्यांच्या पतीनेच पत्नीच्या हत्येचा कट रचल्याचे पोलीस तपासात उघड झाले असून, प्रेमसंबंधातून ही संतापजनक घटना घडली आहे. आरोपी राहुल तायडे हा राज्य राखीव पोलीस दलात कार्यरत असून त्याचे गेल्या चार ते पाच वर्षांपासून दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक प्रेमसंबंध होते....

पिंपरीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन; सामाजिक न्यायाच्या विचारांना नव्याने सलाम

0

पिंपरी – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने खराळवाडी येथील पक्ष कार्यालयात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त विशेष अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महात्मा फुले यांनी समाजातील अंधश्रद्धा, जातिभेद, अन्याय आणि विषमता नष्ट करण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांचा सामाजिक क्रांतीचा वारसा आजही देशभरातील जनतेला प्रेरित करत असल्याचे यावेळी नेत्यांनी सांगितले. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष व...

तरुण पायलटच्या अवयवदानाने सहा जणांना दिला नवा जीवनदानाचा प्रकाश.

0

पुणे: एका 20 वर्षीय तरुण प्रशिक्षु पायलटने अवयवदान करून सहा जणांना नवजीवन दिल्याची हृदयस्पर्शी घटना उघडकीस आली आहे. रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेल्या या तरुणीला डॉक्टरांनी मेंदूमृत घोषित केले. अत्यंत कठीण परिस्थितीत, तिच्या पालकांनी धाडस दाखवत अवयवदानाचा निर्णय घेतला. घटनेचा तपशील: ही तरुणी राजस्थानमधील जयपूरची रहिवासी असून ती पुणे जिल्ह्यातील एका पायलट प्रशिक्षण संस्थेत शिक्षण घेत होती. 9 डिसेंबर रोजी झालेल्या...

Copyright ©