0
0
0
0
0

सामाजिक

Home सामाजिक Page 56

“दहा वर्षांत पुण्याची ‘स्वच्छ हवा’ हरवतेय! IITM शास्त्रज्ञांचा इशारा – Moderate दिवसही आता सुरक्षित नाहीत”

पुणे: गेल्या काही दिवसांपासून पुण्याच्या हवेच्या गुणवत्तेत सातत्याने घसरण होत असून 19 ते 21 नोव्हेंबर या तीन दिवसांत शहरातील PM10 प्रदूषण सर्वाधिक नोंदवले गेले आहे. सेंट्रल पॉल्युशन कंट्रोल बोर्ड (CPCB) च्या नोंदींनुसार नोव्हेंबरमधील जवळपास अर्धा महिना ‘मॉडरेट’ (Moderate) श्रेणीमध्ये गेला आहे, ज्यात PM10 चे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढलेले दिसते. IITM (Indian Institute of Tropical Meteorology) च्या शास्त्रज्ञांनी दिलेल्या इशाऱ्यांनुसार ही स्थिती...

टोयोटा किर्लोस्कर मोटार कंपनी आणि व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयामध्ये सामंजस्य करार

मुंबई : राज्यातल्या तरुणांना दर्जेदार रोजगाराभिमुख औद्योगिक प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराच्या जागतिक संधी निर्माण करण्याच्या कौशल्य विकास विभागाच्या उद्दिष्टानुसार मंत्रालयात कौशल्य, रोजगार व उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत टोयोटा किर्लोस्कर मोटार कंपनी आणि व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयामध्ये सामंजस्य करार करण्यात आला.       या करारान्वये टोयोटा किर्लोस्कर मोटार कंपनी राज्यातील ४५ आयटीआय संस्थांमध्ये ( एलएमव्ही) हलकी वाहन तंत्रज्ञ अभ्यासक्रमांसाठी सुसज्ज प्रयोगशाळांची उभारणी करणार असून तेथे शिक्षकांना प्रशिक्षित...

पुणे पोलिसांची ऐतिहासिक कारवाई! मध्यप्रदेशातील उमरटी गावात अवैध शस्त्रनिर्मिती रॅकेट उद्ध्वस्त — ३६ जणांना ताब्यात

पुणे शहर पोलिसांनी संघटित गुन्हेगारीविरोधात पुन्हा एकदा जोरदार प्रहार करत मध्यप्रदेशातील उमरटी (तहसील लेघवा, जि. बडवाणी) या भागात मोठ्या प्रमाणावर चालणारे बेकायदेशीर शस्त्रनिर्मिती आणि तस्करीचे रॅकेट उद्ध्वस्त केले. कशी उघडकीस आली ‘उमरटी शिकलगार आर्म्स (USA)’ची काळी दुनिया? पुणे शहरात गेल्या काही आठवड्यांत विमानतळ पोलीस स्टेशन, काळेपडळ, खं.विप-1, खं.विप-2 आणि युनिट-3 यांनी मिळून २१ अवैध आग्नेयास्त्रांची जप्ती केली होती. या तपासात असे...

बंडगार्डन पोलिसांची धडक कारवाई — दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले सराईत आरोपी जेरबंद! ३२,१६० रुपयांचा मुद्देमाल जप्त

पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे प्रतिबंधक पथकाने आणखी एक मोठी आणि कौतुकास्पद कारवाई करत दरोडा टाकण्याची तयारी करणाऱ्या तीन सराईत आरोपींना ताब्यात घेतले. यामध्ये पोलिसांनी दरोड्याचे साहित्य व ६ चोरीचे मोबाईल फोन असा एकूण ₹३२,१६० किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. कशी झाली कारवाई? बंडगार्डन पोलिस स्टेशनच्या हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करत असताना, पोलीस अंमलदार कृष्णकांत श्रीराम, ज्ञानेश्वर गायकवाड व राजू धुलगुडे यांना...

पुणे पोलिसांची भव्य कारवाई! आंतरराज्य बेकायदेशीर शस्त्रनिर्मिती रॅकेटचा पर्दाफाश – 36 जण ताब्यात, 21 शस्त्रे जप्त

संघटित गुन्हेगारीविरोधातील मोठा विजय मिळवत, पुणे पोलिसांच्या झोन-4 आणि क्राईम ब्रांचच्या विशेष पथकाने आंतरराज्य बेकायदेशीर शस्त्रनिर्मिती व तस्करी रॅकेटचा मोठा भंडाफोड केला आहे. या धडक मोहिमेत 36 संशयितांना ताब्यात, तर 21 अवैध शस्त्रांसह मोठ्या प्रमाणात जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणातील कारवाईमुळे संपूर्ण गुन्हेगारी जगतात खळबळ उडाली आहे.   शस्त्र तस्करीचा पहिला धागा – 21 शस्त्रांची जप्ती पोलिसांनी गेल्या 3...

कल्याण गुन्हे शाखेची धडक कारवाई! ३ गावठी पिस्तुले, ३ जिवंत काडतुसे आणि घातक शस्त्रे जप्त — सराईत गुन्हेगार जेरबंद

कल्याण गुन्हे शाखा युनिट-03 ने नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत आणखी एक मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत ३ गावठी पिस्तुले, ३ जिवंत काडतुसे आणि अन्य घातक शस्त्रे जप्त करण्यात आली असून, सराईत गुन्हेगाराला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. ही कारवाई कल्याण परिसरातील वाढत्या बेकायदेशीर शस्त्रप्रकरणांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने करण्यात आली. पोलिसांनी अत्यंत गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचला आणि...

21 वा हप्ता रब्बी हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.” – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

पुणे : "केंद्र सरकार व राज्य सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभे आहेत. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 21 व्या हफ्त्याचं वितरण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. यापूर्वी राज्य शासनाने ही अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून भरीव रक्कम वितरित करण्याचं काम केलं आहे. या नवीन 21 व्या हप्त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना लागवड, बियाणे, उपजीविका आणि इतर कृषी खर्चासाठी...

विषमुक्त शेती करणे हेच देशाचे मिशन- राज्यपाल आचार्य देवव्रत

पुणे :  विषमुक्त शेती करणे हेच देशाचे मिशन असून नैसर्गिक व सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांकडून प्रेरणा घेऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळावे, असे आवाहन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या २१ व्या हप्त्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तामिळनाडू राज्यातील कोईम्बतूर  येथून ऑनलाइन पद्धतीने वितरण झाले. या कार्यक्रमास कृषी महाविद्यालय पुणे येथून दूरदृष्य प्रणालीद्वारे...

“पुट्टपर्थीत भगवान श्री सत्य साई बाबा जन्मशताब्दी महोत्सव तेजोमय; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रमुख उपस्थिती — आध्यात्मिकता, सेवाभाव आणि राष्ट्रनिर्मितीचे संदेश”

आंध्र प्रदेशातील पुट्टपर्थी येथील वातावरण आज सकाळपासून भक्तीभाव, अध्यात्म आणि सकारात्मक उर्जेने भारून गेले होते. भगवान श्री सत्य साई बाबा जन्मशताब्दी महोत्सव या ऐतिहासिक कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली. त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला एक वेगळेच औचित्य लाभले. कार्यक्रमात प्रतिष्ठित मान्यवरांची उपस्थिती मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत या कार्यक्रमास— ओडिशाचे राज्यपाल डॉ. हरि बाबू कंभमपति केंद्रीय मंत्री व खासदार...

स्वस्थ भारतासाठी निसर्गोपचाराचा अवलंब करण्याची गरज – राज्यपाल

पुणे : निसर्गोपचार, आयुर्वेद, आपली पूर्वीची जीवनशैली, नैसर्गिक शेती तसेच आपल्या जीवनमूल्यांना पुन्हा अवलंबल्यास स्वस्थ भारत बनवू शकू, असा विश्वास राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी व्यक्त केला. या कामात निसर्गोपचार वैद्यक व्यवसायी, संशोधक, प्राध्यापक, विद्यार्थी महत्त्वाची भूमिका बजावतील, असेही ते म्हणाले. राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था पुणे अंतर्गत येवलेवाडीतील  निसर्गग्राम येथे आयोजित आठव्या निसर्गोपचार दिन समारंभात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय आयुष राज्यमंत्री...

Copyright ©