पुणे: पुण्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील वाहतूक विभागात कार्यरत असलेल्या महिला पोलीस कॉन्स्टेबल अनुराधा धवळे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आला आहे.
तिने आपल्या मित्राच्या पत्नीला एका परदेशी व्यक्तीसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास प्रवृत्त केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात कोल्हापूरच्या गडहिंग्लज पोलीस ठाण्यात पीडितेने तक्रार दाखल केल्यानंतर धवळे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अनुराधा धवळे हिने तक्रारदार महिलेला धमकी दिली होती की जर तिने या व्यक्तीसोबत शारीरिक संबंध ठेवले नाहीत, तर तिच्या कुटुंबातील सदस्यांना जीवे मारले जाईल.
धवळे हिने स्वतःला पुण्याची स्थानिक असल्याचे सांगून ती अनेक गुन्हेगारी टोळ्यांशी परिचित असल्याचा दावा केला होता. तिने सांगितले की, ती एका सामाजिक संस्थेशी संलग्न आहे, जी काळा पैसा कायदेशीर स्वरूपात बदलण्याचे काम करते.
धवळे हिने ९ कोटी रुपयांचे व्यवहार केले असल्याचे सांगितले आणि पीडितेच्या पतीला ४० ते ५० लाख रुपये मिळतील असेही आश्वासन दिले. या प्रकरणाची पुढील चौकशी सुरु आहे.