अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला, त्याबद्दल अशोक सरांचे मनापासून अभिनंदन. मी मागे एकदा म्हणालो तसं, एकाच वेळेला सिनेमा, रंगभूमी आणि टीव्ही ह्या तिन्ही माध्यमांवर हुकूमत गाजवणारे चतुरस्त्र कलाकार ह्या देशाने खूप कमी पाहिले, अशोक सर त्यातले एक”, अशा शब्दांत राज ठाकरेंनी अशोक सराफ यांचं अभिनंदन केलं. कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी २०२३ सालचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार अशोक सराफांना जाहीर झाल्यानंतर सर्व स्तरांतून त्यांचं कौतुक केलं जातंय. तसंच, रसिक मनाचे राजकारणी अशी ख्याती असलेल्या राज ठाकरे यांनीही अशोक सराफांचं अभिनंदन केलं आहे. अशी ही बनवाबनवीसह मराठीतील असंख्य मराठी चित्रपट आणि नाटकांतून रसिकमनाचे मनोरंजन करणारे मराठीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी २०२३ सालचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार अशोक सराफांना जाहीर झाल्यानंतर सर्व स्तरांतून त्यांचं कौतुक केलं जातंय. तसंच, रसिक मनाचे राजकारणी अशी ख्याती असलेल्या राज ठाकरे यांनीही अशोक सराफांचं अभिनंदन केलं आहे.मराठीत कलाकारांचा अजिबात तुटवडा नाही, पण आपल्या भाषेच्या सीमा ओलांडून एखादा नट देशव्यापी ओळखला जातोय किंवा त्यासाठी प्रयत्न करतोय असं दिसत नाही. पण अशोक सर ह्या बाबतीत देखील अपवाद ठरले. महाराष्ट्र भूषणसारखे राज्यातील सर्वोच्च नागरी पुरस्कार कलाकरांना ते उमेदीत असताना मिळावेत असं मला वाटतं. अर्थात हे प्रत्येक वेळेला होतंच असं नाही पण अशोक सरांच्या बाबतीत राज्य सरकारने योग्य टप्प्यावर त्यांचा उचित सन्मान केला ह्याबद्दल राज्य सरकारचं पण मनापासून अभिनंदन ”,
अशोक सराफांची कारकिर्द
मूळचे बेळगावचे असणाऱ्या अशोक सराफ यांचा जन्म मुंबईत झाला.दक्षिण मुंबईतील चिखलवाडी या भागात त्यांचे बालपण गेलं. गोपीनाथ सावकार हे त्यांचे मामा होत. अशोक सराफ यांचे शिक्षण मुंबईतील डी.जी.टी. विद्यालयात झाले. त्यांना सुरुवातीपासूनच नाटकांची अतिशय आवड होती. वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी शिरवाडकरांच्या ‘ ययाती आणि देवयानी ‘ या नाटकातील विदूषकाच्या भूमिकेद्वारा व्यावसायिक रंगभूमीवर पाऊल ठेवलं. काही संगीत नाटकांतूनदेखील त्यांनी भूमिका केल्या. त्यांची आजवरची लक्षात राहिलेली भूमिका म्हणजे अशीही बनवा बनवी या सिनेमातली धनंजय मानेची भूमिका आहे. तसंच ‘पांडू हवालदार’ या सिनेमात त्यांनी दादा कोंडकेंसह अभिनय केला. तसंच ‘राम राम गंगाराम’ या दोन चित्रपटांमध्ये दादा कोंडके यांच्यासह त्यांनी भूमिका केल्या. त्या दोन सिनेमांमधला अभिनयही लोकांच्या लक्षात आहे.
पुरस्कार मिळाल्यानंतर अशोक सराफ काय म्हणाले?
“माझ्या मनात अत्यंत संमिश्र भावना आहेत. हा पुरस्कार मिळणं ही अत्यंत मानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. आजवर ज्या थोर लोकांना हा पुरस्कार मिळाला आहे आज मला त्यांच्या बरोबरीने नेऊन बसवलं आहे ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. ‘महाराष्ट्र भूषण’ हा महाराष्ट्राचा नंबर वन पुरस्कार आहे असं मी समजतो. गेली ५० वर्षं मी चित्रपट, नाटक, मालिका करतोय त्यातली मेहनत कुठेतरी सत्कारणी लागली अन् प्रेक्षकांनीही त्याला दाद दिली त्याचा मला प्रचंड आनंद आहे”, असं अशोक सराफ म्हणाले