मावळातील आरोग्य सेवांमध्ये पडणार मोठी भर: वडगाव-कान्हे आणि लोणावळा उपजिल्हा रुग्णालयासाठी अत्याधुनिक सुविधा मंजूर
मुंबई, ७ ऑगस्ट — मावळ तालुक्यातील वडगाव-कान्हे आणि लोणावळा येथील उपजिल्हा रुग्णालयांच्या आरोग्य सेवा आणि पायाभूत सुविधांचा आढावा घेण्यासाठी आज महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आढावा बैठक पार पडली. या बैठकीस मावळचे आमदार सुनील शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीत कान्हे उपजिल्हा रुग्णालयात सुरू झालेल्या प्राथमिक आरोग्यसेवांबरोबरच लवकरच येथे सिटी-स्कॅन, एम.आर.आय, कॅथलॅब यांसारख्या अत्याधुनिक सुविधा...
धर्मवीर संभाजी महाराजांच्या “हिंदुभूषण मूर्ती”चा श्रीफळपूजन सोहळा थाटात पार! आमदार महेशदादा लांडगे यांची प्रमुख उपस्थिती
चिंचवड – शहराच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाला उजाळा देत, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या "हिंदुभूषण" शिल्पाची श्रीफळपूजन विधी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडली. या विशेष सोहळ्यास पिंपरी-चिंचवडचे लोकप्रिय आमदार महेशदादा लांडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम अधिक गौरवशाली झाला. महेशदादांनी आपल्या भाषणात सांगितले की, "संभाजी महाराज हे केवळ योद्धा नव्हते, तर हिंदवी स्वराज्याचे खरे रक्षक होते. त्यांच्या शौर्याची आठवण...
युवक उद्योजक चिरंजीव निनाद भोंडवे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
आज आपल्या कुटुंबातील लाडक्या जावयाचे, तरुण आणि प्रेरणादायी उद्योजक चिरंजीव निनाद भोंडवे यांचा वाढदिवस अत्यंत आनंदात साजरा करण्यात आला. या खास दिवशी कुटुंबातील सदस्यांसह अनेक सहकारी, हितचिंतक, मित्रपरिवार, व्यावसायिक मंडळींनी भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या कार्याचा गौरव केला. निनाद भोंडवे यांची कामाबद्दलची निष्ठा, नव्या संधींना सामोरे जाण्याची जिद्द आणि सकारात्मक ऊर्जा ही खरोखरच अनेकांसाठी प्रेरणास्थान आहे. त्यांनी व्यवसायिक...
पुणे-नागपूर ‘वंदे भारत’ एक्सप्रेसचा वेगवान प्रवास! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते १० ऑगस्ट रोजी होणार उद्घाटन
पुणे, ७ ऑगस्ट २०२५ : पुणेकर आणि नागपूरकरांसाठी एक दिलासादायक आणि ऐतिहासिक बातमी आहे! पुणे-नागपूर दरम्यान "वंदे भारत एक्सप्रेस" सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला गेला असून, याचे उद्घाटन १० ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. ही गाडी फडणवीसांच्या मतदारसंघाशी थेट जोडणारी असल्याने राजकीयदृष्ट्याही या सेवेचे महत्त्व अधिक आहे. वंदे भारत चे वैशिष्ट्ये: ९:५० सकाळी नागपूरहून सुटणार आणि रात्री...
गांज्याची मोठ्या प्रमाणावर तस्करी उधळली! — अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई, २६ किलो गांजासह रेकॉर्डवरील आरोपी जेरबंद
पुणे प्रतिनिधी | पुणे शहरात अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात सुरू असलेल्या मोहीमेअंतर्गत अंमली पदार्थ विरोधी पथक १ (क्राईम ब्रँच, पुणे शहर) यांनी एका मोठ्या कारवाईत २६ किलो ८० ग्रॅम गांजासह एक रेकॉर्डवरील गुन्हेगार अटक केला आहे. आरोपीकडून मोटार गाडी, मोबाईलसह एकूण २१.१६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी कोण? अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव अनिल ऊर्फ अण्णा सुभाष राख (वय...
गाडी घासल्यावरून हवेत गोळीबार! – नांदेडसिटी पोलिसांची तात्काळ कारवाई, सहा जणांना अटक
पुणे प्रतिनिधी :- पुणे शहरातील नांदेडसिटी परिसरात गाडी घासल्याच्या क्षुल्लक कारणावरून काही तरुणांनी हवेत थेट तीन गोळ्या झाडून परिसरात दहशत माजवली. ही घटना ४ ऑगस्ट रोजी कोल्हेवाडी भागात घडली. घटनेनंतर संबंधित आरोपी पळून गेले होते. परंतु, नांदेडसिटी पोलिसांनी केवळ २४ तासांत सर्व आरोपींना अटक करत कायदा आणि सुव्यवस्थेचा धाक पुन्हा प्रस्थापित केला आहे. घटनाक्रम: गाडी घासल्याच्या किरकोळ कारणावरून वाद विकोपाला गेला...
चारोली परिसरात बिबट्याचा वावर! नागरिकांनी घ्यावी काळजी, वनविभाग सज्ज
चारोली बुद्रुक परिसरातील दाभाडे वस्तीमध्ये बिबट्या मादी आणि तिची दोन बछडी आढळल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची गंभीर दखल घेत वनविभागाने तात्काळ कारवाई सुरू केली आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जात आहे. वनविभागाचे अधिकारी श्री. ई. आर. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सामाजिक कार्यकर्ते तसेच आमचे सहकारी श्री. अनिकेत गायकवाड यांच्या सहकार्याने ट्रॅप कॅमेरे व यंत्रणा...
कामगारांच्या अंगावर गाडी घालणाऱ्या वृद्ध मालकीणीचा संतापजनक प्रकार; एकच खळबळ
पुण्यातील एका प्रतिष्ठित सोसायटीत धक्कादायक घटना घडली आहे. एका वृद्ध महिला मालकीणीने कामगारांशी वाद वाढल्यावर थेट संतापाच्या भरात स्वतःची चारचाकी गाडी कामगारांच्या अंगावर घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. संबंधित महिला ७० वर्षांच्या वर असून त्या बऱ्याच काळापासून एका मोठ्या प्रॉपर्टीचा मालकीहक्क सांभाळत होत्या. मात्र, काही कामगारांनी...
पुणे महापालिकेत गोंधळ! माजी मनसे नगरसेवक किशोर शिंदे यांचा आयुक्त राम यांच्यावर संताप; “मराठीत बोला, नाहीतर घरी येऊन ठोको!”
पुणे, ६ ऑगस्ट २०२५ – पुणे महापालिकेत आज एका धक्कादायक प्रकारात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी नगरसेवक किशोर शिंदे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या कार्यालयात धडक दिली. चालू बैठकीतच आयुक्तांवर आरडाओरडा करत "मराठीत बोला, नाहीतर घरी येऊन ठोको!" अशी थेट धमकी दिल्याचा आरोप शिंदे यांच्यावर आहे. ही घटना आयुक्तांच्या कार्यालयात घडली, जेव्हा स्वच्छता मोहीम संदर्भात एक बैठक...
नांदेड सिटी पोलीसांची धडाकेबाज कारवाई : रेकॉर्डवरील गुन्हेगाराला गावठी पिस्तुलासह जेरबंद
पुणे – शहरातील गुन्हेगारीवर वचक ठेवत नांदेड सिटी पोलिसांनी पुन्हा एकदा मोठी आणि कौतुकास्पद कारवाई केली आहे. कोल्हेवाडी परिसरात फिरत असलेल्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला गावठी बनावटीच्या पिस्तुलासह अटक करण्यात आली. आरोपीकडे ३५,५०० रुपये किमतीचे पिस्तुल व एक जिवंत काडतूस आढळून आले. घटनेचा सविस्तर तपशील: दि. ०४ ऑगस्ट २०२५ रोजी, नांदेड सिटी पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग दरम्यान पोलीस अंमलदार बंटी मोरे व...




