Home Breaking News पुण्यात परदेशी पर्यटकाच्या रिक्षाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; पर्यटक नाशिककडे पळाले.

पुण्यात परदेशी पर्यटकाच्या रिक्षाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; पर्यटक नाशिककडे पळाले.

51
0

पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथे पर्यटनासाठी आलेल्या एका ब्रिटनच्या पर्यटक महिलेने मस्ती म्हणून रिक्षा चालवताना दुचाकीस्वाराला धडक दिली.

या अपघातात बाळासाहेब दत्तात्रय डेरे (वय ५५) यांचा जागीच मृत्यू झाला. ते नारायणगावच्या वारूळवाडी येथील रहिवासी होते. या घटनेनंतर पर्यटक घाबरून नाशिककडे पळाले.

पाच परदेशी तरुण आणि तरुणी या अपघातानंतर घटनास्थळावरून पळून गेले आणि नाशिकमधील एका खासगी हॉटेलमध्ये जाऊन लपले.

या घटनेनंतर नारायणगाव पोलिसांनी तपास सुरू केला आणि हॉटेलबाहेर पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. मात्र, आरोपी महिला परदेशी असल्यामुळे पोलिसांना कारवाईत अडचणी येत आहेत.

याप्रकरणी नारायणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. डेरे यांच्यासोबत असलेल्या संजय रमेश जाधव यांनी फिर्याद दिली आहे.