वृत्त:
काल संध्याकाळी ठाणे उपवन येथे मद्यधुंद ट्रक चालकाने अनेक दुचाकी आणि इतर वाहनांना धडक दिली. पुणे आणि वरळीतही अशीच घटना घडली. सुदैवाने, कोणतीही जीवितहानी झाली नाही, पण पोलिसांनी अत्यंत किरकोळ कारवाई करत चालक आणि मालकाला सोडून दिले. अपघातग्रस्त वाहन मालकांनी ठाणे पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या अपघातात ९ ते १० दुचाकींना गंभीर नुकसान झाले आहे आणि वाहन मालकांना कोणतीही भरपाई दिली गेलेली नाही.
मोठी बातमी: कुरुडवाडी जवळ एसटी अपघात; ३५ ते ४० प्रवासी सुरक्षित, २४ प्रवासी जखमी
कुरुडवाडी जवळ टेंभुर्णी-कुरुडवाडी महामार्गावर एसटी बसचा अपघात झाला. एसटी बस चालकाला फिट येऊन तोल गेल्यामुळे हा अपघात झाल्याचे प्राथमिक अनुमान आहे. या अपघातानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. टेंभुर्णीहून कुरुडवाडीच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बसला हा अपघात झाला. बसमध्ये ३५ ते ४० प्रवासी होते. पिंपळनेर जवळ वायरीगहून स्वारगेटकडे जाणाऱ्या कुरुडवाडी डेपोच्या बसला अपघात झाला.
या अपघातात २४ प्रवासी जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी सोलापूर येथे हलवण्यात आले आहे. एसटी उलटल्यावर प्रवाशांना बाहेर काढून शेतात बसवण्यात आले. काही जखमींना कुरुडवाडीच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.