मुंबई, १८ नोव्हेंबर २०२४ : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी मुंबईत २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून प्रत्येक नागरिकाने आपले मत महत्त्वाचे मानून जबाबदारीने मतदान करणे आवश्यक आहे. नवमतदार असाल किंवा अनुभवी, मतदान केंद्रावर जाताना काही महत्त्वाच्या गोष्टींचे पालन करणे अनिवार्य आहे. तुमच्या मताचा योग्य उपयोग होण्यासाठी खालील माहिती लक्षात ठेवा.
मतदार यादीत तुमचे नाव तपासा
मतदान केंद्रावर प्रवेश मिळण्यासाठी मतदार यादीत तुमचे नाव असणे अत्यावश्यक आहे. नाव तपासण्यासाठी खालील पर्यायांचा वापर करू शकता:
- ईसीआय वेबसाइट: https://electoralsearch.eci.gov.in/
- मतदार हेल्पलाइन क्रमांक 1950 (STD कोडसह डायल करा).
- SMS सेवा: तुमचा EPIC क्रमांक टाईप करा आणि ECI <EPIC क्रमांक> असा मेसेज 1950 वर पाठवा.
- मतदार हेल्पलाइन अॅप: Android किंवा iOS वरून डाउनलोड करा.
उमेदवारांची माहिती जाणून घ्या
मतदानापूर्वी तुमच्या मतदारसंघातील उमेदवार कोण आहेत याची माहिती असणे गरजेचे आहे. उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी तुम्ही Candidate Affidavit Portal, मतदार हेल्पलाइन अॅप, किंवा भारत निवडणूक आयोगाच्या वेबसाइटला भेट देऊ शकता.
मतदान केंद्रावर हे सोबत ठेवा
मतदान केंद्रावर जाताना खालीलपैकी कोणतीही अधिकृत ओळखपत्र सोबत ठेवा:
- मतदार ओळखपत्र (EPIC)
- पासपोर्ट
- ड्रायव्हिंग लायसन्स
- सरकारी कर्मचारी ओळखपत्र
- बँक/पोस्ट कार्यालयाचा छायाचित्रासह पासबुक
- पॅन कार्ड
- MNREGA जॉब कार्ड
- आरोग्य विमा कार्ड
- निवृत्तीवेतन कागदपत्रे
- आधार कार्ड
मतदान प्रक्रियेची माहिती
- प्रारंभिक तपासणी: मतदान अधिकारी तुमचे नाव मतदार यादीत तपासून तुमचे ओळखपत्र तपासतील.
- शाईची खूण: दुसरे अधिकारी तुमच्या बोटावर शाई लावतील व फॉर्म 17A वर सही घेतील.
- मतदान मशीनवर मतदान: EVM आणि VVPAT मशीनद्वारे मतदान करा. मतदान केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मताची VVPAT पावती ७ सेकंदासाठी दिसेल.
नियमांचे पालन करा
- मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात मोबाईल, कॅमेरे, किंवा अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणे नेणे प्रतिबंधित आहे.
- १०० मीटरच्या परिसरात प्रचार साहित्य, पोस्टर, बॅनर्स लावणे किंवा लाऊडस्पीकर वापरणेही मनाई आहे.
- मतदान केंद्रावर पुरुष आणि महिलांसाठी वेगवेगळ्या रांगा असतील; प्रत्येकाला रांगेप्रमाणे प्रवेश दिला जाईल.
मतदानाची महत्त्वपूर्णता
“मतदान हे केवळ अधिकार नाही तर कर्तव्य आहे,” असे मतदर्शनाचे महत्त्व अधोरेखित करत सर्व नागरिकांनी या प्रक्रियेत भाग घ्यावा आणि आपल्या मताने सुशासनाच्या दिशेने योगदान द्यावे.