मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर एक वेगवान ट्रक अचानक पलटी झाला, ज्याचा भयानक अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सुदैवाने, या अपघातात ट्रकचालकाला फक्त किरकोळ दुखापत झाली. हा अपघात १७ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता मुंबईहून पुण्याकडे जाताना अमृतांजन ब्रिजखालील खोपोली बोरघाटाच्या वळणावर झाला.
अपघातानंतर बोरघाट परिसरात वाहतुकीचा तात्पुरता अडथळा निर्माण झाला. चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला आणि ट्रक रस्त्यातच पलटी झाला. सुदैवाने, या अपघातात मोठा अनर्थ टळला आणि चालक किरकोळ दुखापतीसह बचावला.