Home Breaking News माझी लाडकी बहीण योजना ॲप: माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज थेट ॲपवरून...

माझी लाडकी बहीण योजना ॲप: माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज थेट ॲपवरून करा!

मुंबई: महाराष्ट्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करायचा असल्यास, आता सरकारने तुमच्यासाठी नारी शक्ती दूत ॲप लाँच केले आहे. या ॲपद्वारे तुम्ही घरबसल्या ऑनलाईन अर्ज करू शकता. नारी शक्ती दूत ॲप तुम्ही Google Play Store वरून डाउनलोड करू शकता.

आम्ही तुम्हाला नारी शक्ती ॲपद्वारे माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा ते स्टेप बाय स्टेप सांगणार आहोत.

नारी शक्ती दूत ॲपमधून फॉर्म भरा / महाराष्ट्र नारी शक्ती ॲप लॉगिन

Step 1: सर्वप्रथम तुम्हाला Google Play Store वरून नारी शक्ती दूत ॲप डाउनलोड करावे लागेल. ॲप डाउनलोड झाल्यानंतर ते उघडा. ॲप सुरू केल्यावर तुमच्या स्क्रीनवर ‘Welcome to Nari Shakti Dut this APP.‘ असा संदेश दिसेल.

Step 2: त्यानंतर पुढील तीन स्लाइड्स बघून Done बटणावर क्लिक करा. मग पुढील स्लाइडमध्ये तुमचा मोबाईल नंबर टाका. I Accept बटणावर क्लिक करा आणि नंतर लॉगिन बटणावर क्लिक करा.

Step 3: लॉगिन झाल्यावर तुम्हाला या ॲपमध्ये तुमची प्रोफाइल तयार करावी लागेल. यात तुमचे पूर्ण नाव, ईमेल-आयडी भरावे लागेल. त्यानंतर तुमचा जिल्हा आणि तालुका निवडा. प्रोफाइल अपडेट करा आणि योजना पर्यायावर क्लिक करा.

Step 4: यानंतर ‘माझी लाडकी बहीण’ योजनेचा हमी फॉर्म डाउनलोड करा. मुख्य पृष्ठावर या. तिथे तुम्हाला ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ बटण दिसेल. त्यावर क्लिक करा.

Step 5: यानंतर स्त्रीचे नाव आणि तिच्या वडीलांचे किंवा पतीचे नाव टाका. नंतर जन्मतारीख निवडा. जन्मतारीख निवडताना स्त्री अर्जदाराचे वय २१ ते ६५ दरम्यान असणे आवश्यक आहे.

Step 6: त्यानंतर जिल्हा, गाव/शहर निवडा. तसेच तुमचे स्थानिक स्वराज्य संस्था निवडा. पिनकोड आणि पत्त्याची माहिती भरा. यासोबतच मोबाईल नंबर देखील भरा.

Step 7: पुढे, तुम्हाला विचारले जाईल की तुम्हाला सरकारच्या इतर योजनांचा लाभ मिळतो का. जर हो असेल तर Yes वर क्लिक करा, नसल्यास No वर क्लिक करा.

Step 8: यानंतर तुमची बँक संबंधित माहिती भरा. यात बँकेत असलेले तुमचे पूर्ण नाव, बँक खाते क्रमांक आणि IFSC कोड टाका.

Step 9: त्यानंतर तुम्हाला काही कागदपत्रे अपलोड करावी लागतील. यामध्ये आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र किंवा पिवळे/केशरी रेशन कार्ड, अर्जदाराचे अंडरटेकिंग, बँक पासबुक यांचा समावेश आहे. अर्जदाराचा फोटो देखील जोडावा लागेल.

Step 10: नंतर Accept Warranty Disclaimer बॉक्सवर टिक करा. Submit Information पर्यायावर क्लिक करा आणि तुमचा अर्ज सबमिट करा.