दरम्यान, 02 जुलै 2023 रोजी राज्याचा राजकारणात मोठा भूकंप आला होता. या दिवशी अजित पवार शरद पवारांना सोडून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले होते.
सत्तेत सामील होताचं अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या सर्व घटनांनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसले आहे.
अशा शरद पवार आणि अजित पवार यांच्या सातत्याने होणाऱ्या भेटींवरून राज्याच्या राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू आहे.देशामध्ये आनंदात आणि उत्साहात दिवाळी सण साजरा केला जात आहे. पवार कुटुंब दरवर्षी बारामती येथील गोविंद बागेत दिवाळी साजरी करण्यासाठी एकत्र येतं.अशात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर अजित पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहतील का❓❓ असा प्रश्न उपस्थित झाला होता. दिवसभर अजित पवार या कार्यक्रमाला येणार नसल्याचं बोललं जात होतं. परंतु, रात्री उशिरा अजित पवार सहकुटुंब या कार्यक्रमामध्ये दाखल झाले.
त्यानंतर भाऊबीजेच्या दिवशी शरद पवार, अजित पवारांच्या निवासस्थानी गेले होते. या घटनांतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये नक्की चाललय काय? असा सवाल उपस्थित झाला आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.दोन पवारांची भेट झाल्यानंतर त्यांच्या डोक्यात काय आहे? हे त्यांच्या भेटीनंतर कळत असा सवाल पत्रकारांनी शरद पवारांना विचारला.
यावर उत्तर देत शरद पवार म्हणाले, “होय! सर्वांना लवकरच आमच्या भेटीचा अर्थ कळेल. निवडणुकीचा निकाल लागताचं आमच्या भेटीचा अर्थ कळेल.”
शरद पवार यांच्या या सूचक विधानानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. त्याचबरोबर त्यांच्या या वक्तव्याचे राज्याच्या राजकारणात वेगवेगळे अर्थ लावले जात आहे.