पुणे शहरात अंमली पदार्थ विरोधी मोहिमेला वेग!
पुणे शहरातील गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक – १ ने मोठी कारवाई करत तब्बल ७७ कोटी ६० लाख १ हजार २३६ रुपयांचा अंमली पदार्थांचा साठा अधिकृतपणे नष्ट केला आहे. पुणे पोलिसांच्या कार्यक्षेत्रातील ९ पोलीस ठाण्यांच्या अभिलेखावर असलेल्या ५७ एन.डी.पी.एस. (NDPS) गुन्ह्यांमध्ये जप्त केलेल्या अंमली पदार्थांची विल्हेवाट लावण्यात आली.
संपूर्ण मुद्देमालाची माहिती:
नाश करण्यात आलेल्या अंमली पदार्थांमध्ये खालील पदार्थांचा समावेश आहे –
गांजा
एम.डी. (मेथॅम्फेटामाइन)
इफेड्रीन
कोकेन
एल.एस.डी.
चरस
अफिम
पॉपीस्ट्रॉ
हेरॉईन
गांजा मिश्रित बंटा गोळी
संपूर्ण मुद्देमालाचा ७८८ किलो ९५४ ग्रॅम ०६३ मि.ग्रॅम इतका प्रचंड साठा Maharashtra Enviro Power Ltd., Ranjangaon MIDC, Shirur, Pune येथील भट्टीत जाळून नष्ट करण्यात आला.
ड्रग डिस्पोजल कमिटीच्या देखरेखीखाली नाश प्रक्रिया
पारदर्शक आणि नियमानुसार नाश प्रक्रिया पार पाडण्यासाठी विशेष ड्रग डिस्पोजल कमिटी स्थापन करण्यात आली होती. दि. २५ मार्च २०२५ रोजी पुणे पोलीस मुख्यालयातील रिक्रिएशन हॉल, शिवाजीनगर, पुणे येथे अंमली पदार्थांचा प्रत्यक्ष नाश करण्यापूर्वी त्याचे वजन आणि परीक्षण करण्यात आले.
प्रमुख अधिकारी:
मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर – अमितेश कुमार
मा. पोलीस सह आयुक्त, पुणे शहर – रंजनकुमार शर्मा
ड्रग डिस्पोजल कमिटीचे सदस्य:
मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे – शैलेश बलकवडे (अध्यक्ष)
मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, पुणे – निखील पिंगळे (सदस्य)
मा. पोलीस उप आयुक्त, मुख्यालय, पुणे – संदीप भाजीभाखरे (सदस्य)
Video Player
00:00
00:00